स्टफ पेपर मसाला
Stuff Pepper Masala
चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
आज जरा मस्त काहीतरी तिखट आणि झणझणीत खावूया....
अगदी थेट हॉटेल मध्ये, साक्षात एखाद्या पंचतारांकीत हॉटेल मध्ये जेवायला बसल्या सारखेच भासेल तुम्हाला हि डिश तुम्ही मन लावून नीट केलीत तर...नक्कीच
आजची आपली डिश आहे स्टफ पेपर मसाला...
साहित्य
चार जणांसाठीसाधारण एकाच आकाराच्या लाल आणि पिवळ्या बेल पेप्पर्स - ४
(या लाल आणि पिवळ्या मिरच्या नीट बघून सगळ्यांचे बेस नीट मिरची उभी राहील असे आहेत न हे कन्फर्म करा आणि मगच घ्या. आपल्या नेहेमीच्या वापरातल्या हिरव्या भोपाली मिरच्या सुद्धा घेतल्या तरी चालतील पण त्या जरा अधिक तिखट असतात आणि सगळी डिश तयार झाल्यावर या मिरच्या छान टणक उभ्या राहतात आणि हिरव्या मिरच्या मात्र मन टाकतात त्यामुळे स्टफिंग नीट राहत नाही...आणि हिरव्या मिरच्या जरा जास्त तिखट असतात...या लाल आणि पिवळ्या मिरच्या साधारण गोडसर असतात त्यामुळे या डिश मध्ये जबऱ्या लागतात...पुण्यात हि मिरची साधारण २० रुपयाला एक मिळते)
साधारण मध्यम आकाराचे बटाटे ४
कांदे - २
लसूण - ८ पाकळ्या
आलं - २ इंच ( ताजा आणि रसरशीत तुकडा )
हिरव्या मिरच्या - ४ (बिया काढून तुकडे केलेल्या )
तेल - ६ चमचे
वांग - २ (अगदी बारीक चौकोनी तुकडे करा , शिजतात आणि दिसतात हि छान नंतर )
जिरे - ४ चमचे
हळद - १ चमचा
हिंग - अर्धा चमचा
धने पावडर - २ चमचे
जिरे पावडर - २ चमचे
लाल तिखट - १ चमचा (शक्य असल्यास काश्मिरी तिखट अन्यथा कुठलेही चालेल)
साखर - २ चमचे
लिंबाचा रस - ५ चमचे
काळी मिरी पावडर - १ चमचा
आमचूर पावडर - १ चमचा
कलौन्जी - २ चमचे (मूळ नाव Onion seeds पण बाजारात कलौन्जी म्हणून मिळते , घातली नाहीत म्हणून काही बिघडत नाही पण घात्रालीत तर मध्ये मध्ये याची चव या डिश मध्ये भन्नाट लागते, जास्त महाग नसते, घरात आणून ठेवायला हरकत नाही थोडीशी १० ग्राम वगैरे)
कसुरी मेथी - १ चमचा (किंचित कडवट चव छान लागते, आवडत नसल्यास वापरली नाही तरी चालेल)
मीठ - २ चमचे
पाककृती
१ ) बेल पेप्पर्सचे (लाल पिवळ्या मिरच्यांचे) देठ कापून आतल्या बिया काढून टाका आणि स्टफिंग भारता येईल इतके मोठे तोंड वर तयार करा. एखाद्या मिरचीचा बेस ओबडधोबड असेल तर तळाचा अगदी पात्तळ काप कापा म्हणजे मिरची छान नीट उभी राहू शकेल.
२) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळून नंतर त्यात सगळ्या मिरच्या आणि बटाटे टाका आणि झाकण बंद करून घड्याळ लावा. साधारण ८ मिनिटांनी मिरच्या बाहेर काढा आणि आतले पाणी काढून बाजूला ठेवा. बटाटे तसेच पुढे अजून किमान ५ मिनिटे (एकंदर १३ - १३ मिनिटे) तसेच झाकण बंद पातेल्यात उकडू द्या. वेळ झाल्यावर बटाटे बाहेर काढून त्यांची साले काढून अगदी बारीक चौकोनी तुकडे करा , शिजतात आणि दिसतात हि छान नंतर.
३) चिरलेला कांदा, आलं, लसूण , बिया काढलेल्या हिरव्या मिरच्या, कसुरी मेथी, आमचूर पावडर मिक्सर च्या लहान भांड्यात किंचित पाणी घालून पेस्ट होईल असे फिरवून घ्या.
४) एका नॉन स्टिक पॅन मध्ये २ चमचे तेल घालून तेल तापल्यावर त्यात बटाट्याच्या एकदम बारीक केलल्या फोडी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या आणि झाल्यावर बाजूला एका प्लेट मध्ये ठेवा.
५) याच पॅन मध्ये आता वांग्याच्या फोडी सुद्धा अश्याच सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या आणि झाल्यावर बाजूला एका प्लेट मध्ये ठेवा.
६) आता याच पॅन मध्ये २ चमचे तेल घालून तेल तापल्यावर जिरे घाला, साधारण परतल्यावर हिंग घाला...एक चमचा साखर घालून आता किंचित हलवून घ्या....कलौन्जी घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या....आता यात हळद, धने पावडर आणि जिरे पावडर घाला आणि व्यवस्थित परतून घ्या....आता लगेच याच पॅन मध्ये मगासचे आपण मिक्सर मध्ये तयार केलेले मिश्रण घालून कांदा साधारण सोनेरी होईपर्यंत नीट परतून घ्या. हे मिश्रण साधारण घट्टच तयार होते . अजून पाणी घालू नका.
आता या स्टफिंग चा भन्नाट वास सुटायला सुरुवात होईल...
पण...
तुम्हाला आपला नियम माहिती आहेच...
घरच्यांना जवळपास फिरकू देऊ नका आत्ताच ...
प्लेटिंग केल्यावर थेट टेबलावरच त्यांना या अदभूत डिश चा आस्वाद घेऊ द्या............
७) आता याच पॅन मध्ये मगाशी परतून घेतलेली वांगी आणि बटाटे घालून व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करा. फोडी तशाच्या तश्या राहिल्या तर प्लेटिंग करताना छान दिसतात.आता यात तिखट, मीठ, साखर घाला आणि जरासे पाणी सुटले कि मग लिंबू रस घाला आणि २-३ चमचे पाणी घालून व्यवस्थित घट्ट होई पर्यंत परतून घ्या.
हे आपले सारण तयार झाले. हे साधारण घट्ट पण सरसरीत असेच राहावे म्हणजे व्यवस्थित भरता येते.
८) आता घरी असेल तर ग्रीलपॅन वर (हा ग्रीलपॅन नसेल घरी तरी हरकत नाही, आपल्या घरच्या साधारण पसरट तव्यावर हे केल तरी चालेल...No problem ) तेल लावून त्यावर या मिरच्या उभ्या ठेवून त्यात लहान चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्या. आणि मंद अग्नीवर आता जवळपास या मिरच्या ५ मिनिटे अश्याच झाकण न लावता ठेवा...आता पुन्हा एक चमचा तेल या ग्रीलपॅन वर मिरच्यांचा आसपास हलकेच पसरा आणि पुन्हा मिरच्या खमंग भाजून घ्या....
आता मस्त चर्रर्र्र आवाज येत मिरच्या तयार होत आहेत...
सगळ्या मसाल्यांचा मस्त गंध पसरत आहे...
भूक लागलेली आहे....
व्वा...
धम्माल आहे...
हा ग्रीलपॅन तसाच्या तसा आता टेबलावर घ्या...एखादा चमचा लिंबाचा रस वर शिंपडा आणि मस्त चिरलेली बारीक ताजी रसरशीत हिरवीगार कोथिंबीर वर पसरा....
गरमागरम पोळ्या ताटात वाढा...शेजारी कांदा, लिंबू आणि टोमाटो सोबतीला ठेवा...
गरमागरम वाफाळत्या भाता सोबतही हि डिश छानच लागते.....
घरच्यांना टेबलावर आमंत्रित करा...
आता भोजन मंत्र म्हणा....
आणि होऊन जाऊ द्या सुरुवात...
आक्रमण.....................
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...
आणि हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....
आणि हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....


No comments:
Post a Comment